
श्री म्हसोबा भैरवनाथ काळूबाई शंकर मंदिर ट्रस्ट खारावडे संस्थेची वेबसाईट नुतनीकरण आ. मा. डॉ. नीलमताई गोऱ्हे (उपसभापती विधानपरिवह, महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते दि. ०६ एप्रिल २०२३ गुरुवार रोजी सकाळी ११:०० वाजता होणार आहे.
इतिहास

पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य मुळशी तालुक्यातील रमणीय परिसरातील खारवडे गावात भाविकांच्या भक्तीचे श्रध्दास्थान असलेले स्वयंभू नि जागृत असे नवसाला पावणारे मुळशी तालुक्यातील भक्कतीवैभवी तिर्थक्षेत्र श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्ट. खारवडे येथे घनदाट झाडीत झाडाचा पालापाचोळा गोळा करीत असताना निंबोनीच्या झाडाखाली हाताला शेंदूर लागल्याने बुवाजी मारणे अतिशय घाबरून गेले. त्याच दिवशी, त्याच रात्री त्यांना श्री म्हसोबाची उत्पत्ती होत असल्याचा दृष्टांत झाल्यावरून त्याच ठिकाणी उत्खनन केले असता शेंदूर लावलेली मोठी मूर्ती आढळली आणि तीच ही सध्याची श्री म्हसोबा देवाची मुळ मूर्ती.
आणि त्यामुळेच खारवडे हे श्री म्हसोबाचे मुळ स्थान समजले जाते. ही उत्पत्तीची कथा १३ व्या शतकातील असल्याची अख्यायीका आहे. स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर दर्शनाला येत असा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सरदार दयाजीराव मारणे यांचे हे कार्यक्षेत्र. देवाचा कारभार सर्व ग्रामस्थ पहात असत.

नियोजनामध्ये सुसुत्रता यावी ह्यासाठी ८ ऑगस्ट १९९३ रोजी कै.लक्ष्मणराव तुकाराम मारणे व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी देवस्थान ट्रस्टची रितसर नोंदणी केली. शासनातर्फे ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. शासनातर्फे तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत विविध योजनांसाठी निधी मिळाला असून त्याच्या माध्यमातून भाविकांच्या सुखसोयींसाठी वाहनतळ, भक्तनिवास, दर्शनबारी, मंदीर परिसर सुशोभीकरण करण्यात आले आहे.
भाविकांच्या मिळालेल्या देणगीमधून मंदीराचा भव्य दिव्य असा जिणोंध्दार करण्यात आला आहे. मंदीराला १०० तोळे सोन्याचा कळस बसविण्यात आला आहे. धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक बांधीलकीच्या हेतूने परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय शिष्यवृत्ती, पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी दवाखाना, सुसज्ज रूग्णवाहिका आणि इतर बरेच उपक्रम राबविले जातात. गेले ४०० वर्षे चालू असलेली पशुबळीची व कौल लावण्याची प्रथा कायमची बंद करण्यात आली आहे. अशा ह्या श्री म्हसोबा देवस्थानला दर रविवार, पौर्णिमा, अमावस्या ह्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी असते.